Clash between two groups in Morgaon मोरगावात दोन गटात तुंबळ हाणामारी

पोलिसात परस्परविरोधी गुन्हा : एका गटाच्या पाच तर दुसर्‍या गटाच्या चार संशयीतांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा


Clash between two groups in Morgaon रावेर : तालुक्यातील मोरगाव येथे किरकोळ कारणावरून दोन गटात झालेला शाब्दीक वाद हाणामारी पर्यंत पोहोचल्याने दोन्ही गटाच्या नऊ जणांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी धाव घेत गावात शांतता प्रस्थापीत केली आहे.

किरकोळ कारणावरून माय-लेकास मारहाण
शनिवार, 22 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास माय-लेकास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रावेर पोलिसात पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल धर्मराज नाईक (38, मोरगाव खुर्द) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या लहान मुलीला संशयीत आकाश पाटील याने चिमटी घेत डोळे ताणल्याने त्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने संशयीत शशीकांत माधव पाटील, राजेंद्र माधव पाटील, रीतेश प्रल्हाद पाटील, आकाश राजेंद्र पाटील, रेखा राजेंद्र पाटील (मोरगाव खुर्द, ता.रावेर) यांनी शिविगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच गावात राहू देणार नाही, अशी धमकी दिली. तपास नाईक अजय खंडेराव करीत आहेत.

दुसर्‍या गटाचीही पोलिसात तक्रार
दुसर्‍या गटातर्फे रेखाबाई राजेंद्र पाटील (42, मोरगाव खुर्द, ता.रावेर) यांच्या तक्रारीनुसार, अमोल धर्मराज नाईक, मनीषा अमोल नाईक, शारदा धर्मराज नाईक, धर्मराज पुरूषोत्तम नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवार, 22 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तक्रारदाराच्या मुलाला संशयीतांनी शिविगाळ केल्यानंतर त्याबाबत जाब विचारल्याने संशयीतांनी अश्लील शिविगाळ केली तसेच वादात पडल्यास मुलाला मारून टाकू, अशी धमकी दिली. तपास पोलिस नाईक अजय खंडेराव करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !