रोकडसह दिड लाखांचे सबमर्सिबल पार्टस चोरट्यांनी लांबवले : बी.जे.मार्केटमध्ये खळबळ


Submersible parts worth half a lakh along with cash were stolen by thieves : excitement in B.J. Market जळगाव : जळगावच्या नवीन बी.जे.मार्केटमध्ये चोरट्यांनी बंद दुकानातून नऊ हजारांच्या रोकडसह सुमारे दीड लाखांचे सबमर्सिबल स्पेअर पार्ट लांबवले. रविवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला.

संधी साधत लांबवले साहित्य
प्रदीप नानकराम रामचंदानी (40, रा.कंवरनगर, जळगाव) यांच्या मालकीचे गुरुनानक ट्रेडर्स या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी नऊ हजार रुपये रोख व दीड लाखांचे सबमर्सिबल पार्टस लांबवले आहेत. प्रदीप रामचंदानी यांनी अहमदाबाद, राजकोट, भडगाव व खेडी येथून आणलेले कॉपरसह गन मेटल बुश आदी साहित्य आणले होते. शुक्रवार, 21 ऑक्टोबर रोजी रात्री ही चोरी झाली आहे. नऊ हजार रुपये रोखसह एक लाख 54 हजारांच्या वस्तू चोरी लांबवल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !