Goods train derailed on Malkhed railway line : Many trains cancelled, Diwali plight of railway passengers मालखेड रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली : अनेक गाड्या रद्द, रेल्वे प्रवाशांचे दिवाळीत हाल
Goods train derailed on Malkhed railway line : Many trains cancelled, Diwali plight of railway passengers अमरावती : रेल्वे प्रवाशांसाठी ऐन दिवाळीत गैरसोय होणारी बातमी समोर आली आहे. अमरावतीजवळ रात्री उशिरा टीमटाला ते मालखेड रेल्वे मार्गावर मालगाडीचे सुमारे 20 डबे रूळावरून घसरल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे तर नागपूर-मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसर्या मार्गाने वळवण्यात आल्या असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रवाशांच्या माहितीसाठी मदत केंद्र विविध स्थानकांवर उघडण्यात आल्याचे माहिती भुसावळ विभागाने दिली आहे.
Maharashtra| 20 loaded coal wagons derailed b/w Malkhed &Timatla stations on Wardha-Badnera sections,Nagpur at around 23.20hrs on Oct 23,resulting in Dn&Up line affected on this section. Multiple trains cancelled/diverted/short terminated; helpline no 0712-2544848:Central Railway pic.twitter.com/gcXrjT2zG8
— ANI (@ANI) October 24, 2022




इंजिनासह मालगाडी घसरली
रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास टीमटाला ते मालखेड दरम्यान मुख्य रेल्वे मार्गावर कोळसा वाहून नेणार्या मालगाडीचे सुमारे 20 डबे घसरले. े इंजिन हे रुळाच्या बाजूला कोसळले तर काही डबे हे रुळावर आडवे झाले. त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, नागपूर, मुंबई जाणारी वाहतूक नरखेड मार्गे वळवण्यात आली आहे. तर काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे डबे रुळावरून बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वेच्या नागपूर डिव्हिजनमध्ये ही घटना घडली. युद्ध पातळीवर वाहतूक सुरळीत करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे.
56 गाड्यांच्या वाहतुकीवर परीणाम
अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे सुमारे 56 गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या अपघातामुळे नागपूर ते बडनेरा आणि बडनेरा ते नागपूर या दोन्ही रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या मालगाडीतून कोळसा वाहून नेण्यात होता.
अनेक गाड्यांचे मार्ग वळवले, काही गाड्या रद्द
22845 पुणे-हटिया एक्स्प्रेस, 12261 सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस, 12139 सीएसएमटी-नागपूर या तीन एक्स्प्रेस गाड्या चांदूर बाजार ते नरखेड मार्गे वळवण्यात आल्या आहेत. 22847 विशाखापट्टनम-एलटीटी, 12656 चेन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेस नागपूर-नरखेड-चांदूरबाजार- बडनेरामार्गे वळवण्यात आली आहे.
याशिवाय 11122 वर्धा-भुसावळ पॅसेंजर, 12140 नागपूर-सीएसएमटी एक्स्प्रेस धामणगाव ते नागपूर परत आणि रद्द, 12119 अमरावती-नागपूर, 11040 गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, 01372 वर्धा-अमरावती, 17642 नरखेड-काचीगुडा, 11121 भुसावळ-वर्धा, 12106 गोंदिया-सीएसएमटी, 12136 नागपूर-पुणे, 12120 अजनी-अमरावती, 12140 नागपूर-सीएसटीएम, 01374 नागपूर-वर्धा या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
20819 पुरी-ओखा वाडी-दौंड-मनमाड-जळगाव मार्गे, 12656 चेन्नई-अहमदाबाद नरखेड-चांदूर बाजार-बडनेरा मार्गे, 12834 हावडा-अहमदाबाद पुलगाव-नागपूर-नरखेड-चांदूर बाजार-बडनेरा मार्गे, 12860 हावडा-सीएसटीएम नागपूर-चांदूर बाजार-बडनेरा मार्गे, 12129 पुणे-हावडा मार्गे बडनेरा-चांदूर बाजार-नागपूर, 12844 अहमदाबाद-पुरी बडनेरा-चांदूरबाजार-नरखेड-नागपूरमार्गे, 18029 एलटीटी-शालीमार बडनेरा-चांदूर बाजार-नागपूर मार्गे वळवण्यात आल्या.
22905 ओखा-हावडा, 12145 एलटीटी-पुरी, 12809 सीएसटीएम-हावडा या गाड्या भुसावळ-खंडवा-इटारसी-नागपूर मार्गे वळवण्यात आल्या, 12160 जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस आणि निझामुद्दिन-भुसावळ एक्स्प्रेस नागपूर येथेच थांबविण्यात आली. 12655 अहमदाबाद -चेन्नई, 22738 हिसार-सिकंदराबाद एक्स्प्रेस या गाड्या अकोला-सिकंदराबाद मार्गे वळवण्यात आल्या. 12105 सीएसटीएम-गोंदिया, 12135 पुणे-नागपूर , 22138 अहमदाबाद-नागपूर, 18029 एलटीटी-शालिमार, 11039 कोल्हापूर-गोंदिया, 12859 सीएसटीएम-हावडा या गाड्या बडनेरा-चांदूरबाजार-नागपूर मार्गे वळवण्यात आल्या.
12289 सीएसटीएम-नागपूर, 12811 एलटीटी-हटिया, 12833 अहमदाबाद-हावडा, 01140 मडगाव-नागपूर, 13426 सुरत-मालदा टाऊन या गाड्या भुसावळ-खंडवा-इटारसी-नागपूर मार्गे वळवण्यात आल्या. 12406 निजामुद्दीन-भुसावळ ही गाड्या इटारसी-खंडवा-भुसावळ मार्गे वळवण्यात आली. 12130 हावडा-पुणे ही गाडी गोंदिया-बल्हारशाह-सिकंदराबाद-वाडी-सोलापूर-पुणे मार्गे वळवण्यात आली.