जळगावातील विवाहित तरुणी बेपत्ता
Married young woman missing from Jalgaon जळगाव : शहरातील 24 वर्षीय तरुण विवाहिता टेलरकडे कपडे घेण्यासाठी गेल्यानंतर घरी न परतल्याने हरवल्याची नोंद एमआयडीसी पोलिसात करण्यात आली आहे. शिरसोली गावातून बेपत्ता झालेल्या या विवाहितेच्या पतीने एमआयडीसी पोलिस स्टेशनला हरवल्याची तक्रार दिली आहे.
पोलिसांकडून विवाहितेचा शोध
शिरसोली प्र.न. गावातील बेपत्ता झालेल्या विवाहितेचा रंग गोरा, उंची 165 से.मी. असून तिने अंगात पोपटी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे. हवालदार जितेंद्र राठोड पुढील तपास करीत आहेत.
