A 34-year-old youth from Navi died after falling into a well न्हावीतील 34 वर्षीय तरुणाचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू


A 34-year-old youth from Navi died after falling into a well यावल : तालुक्यातील न्हावी येथील शेत शिवारातील विहिरीजवळ व्हरंडीवर बसलेल्या तरुणाचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. मयत तरूणाचा मृतदेह विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भरत पांडुरंग बोरोले (34) असे मयत तरुणाचे नाव आहे.

तोल जावून पडल्याने मृत्यू
भरत हा गावालगत असलेल्या नामदेव फिरके यांच्या शेत विहिरीच्या व्हरंडीवर बसला असता अचानक त्याचा तोल गेला व तो विहिरीत कोसळला व पाण्यात बुडाला. ग्रामस्थांनी विहिरीत शोध मोहीम राबवली व त्याचा मृतदेह विहिरीतून काढून यावल रुग्णालयात हलवला. डॉ. सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवला. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत तरुणाच्या पश्चात आई, बहीण असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !