रावेरात अवैध वाळू वाहतूक : सव्वा लाखांचा दंड वसुल
रावेर : अवैध वाळू वाहतूक करणा-यांवर महसूल पथकाने मध्यरात्री कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे सुमारे सव्वा लाखाचा दंड असून सुध्दा अवैध वाळु वाहतूक थांबता-थांबेना असे चित्र झाले आहे. महसूल अधिकारी रात्र झोपतात आणि याचाच लाभ घेऊन भोकर,तापी,सुकी नदीतुन दिवसा सोडून रात्रीच्या वेळी अवैध वाळु वाहतूक करण्याचा वाळु माफियाचा मनसूबा महसूल पथकाने हाणून पाडला असून आता रात्रीच्या वाहतुकीवर महसूल विभागाने आपला मोर्चा वळवीला आहे.
उटखेडानजीक कारवाई
सुकी नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणार्या टॅक्टर-ट्रॉलीवर धडक कारवाई करत रात्री बारा वाजता पकडण्यात आले यामध्ये मंडळ अधिकारी संदीप जैस्वाल तलाठी अजय महाजन,सलीम तडवी,प्रवीण वानखेडे, तेजस पाटील या पथकाने कारवाई केली आहे

वाळू माफियांची मनमानी
अवैध वाहतूक केल्यास सव्वा लाखाचा दंड महसूल विभागा कडून ठोकविण्यात येतो तरी या दंडा न जुमानता अवैध वाळु वाहतूक करणारे माफिया रात्र व पहाटच्या सुमारास वाहतूक करत असतात तालुक्यातील भोकर, तापी,सुकी नदिला अनधिकृत पोखरत शेकडो ब्रास वाळु वाहतूक करत असतात तसेच रावेर शहरात प्रवेश करण्यासाठी चुप्या रस्त्याचा वापर करण्यात येतो


