भुसावळ लेवा समाज मंडळातर्फे वधू-वर सूची प्रकाशित होणार


भुसावळ : श्री सदगुरू झेंडूजी महाराज बेळीकर लेवा पाटीदार समाज संस्था, भुसावळ व श्री महालक्ष्मी ग्रुपतर्फे रविवारी झालेल्या बैठकीत उपवर मुला मुलींसाठी वधू-वर सूची परीचय पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. परीचय पुस्तकात नावे देण्यासाठी लागणार्‍या फॉर्मचे यावेळेस प्रकाशन तसेच वितरण करण्यात आले. जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, बुलढाणा जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील समाज बांधवांनी उपवर मुला मुलींचे परीचय पत्रक भरून 10 जानेवारी 2020 पर्यंत द्यावे, असे आवाहन अध्यक्ष दिनेश भंगाळे यांनी केले आहे. वधू-वर परीचय पुस्तिका व स्नेहमिलन सोहळा यासंदर्भात नियोजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी सुधीर पाटील, सुरेश देवकर, सुपडू भंगाळे, झेंडूजी महाराज बेळीकर संस्थेचे अध्यक्ष दिनेश भंगाळे, सचिव अनिकेत पाटील, किशोर पाटील, प्रा.धिरज पाटील, सुरेश बर्‍हाटे, अरुण धांडे, किशोर पाटील, किरण कोलते, दिपक धांडे, बबलू बर्‍हाटे, प्रशांत देवकर, मोहन पाटील, अरविंद कुरकुरे, बाबुराव भंगाळे, कैलास कुरकुरे, शिशिर जावळे, सुनील बर्‍हाटे, चंद्रकांत पाटील, प्रकाश पाटील, धर्मराज देवकर, दीपक झांबरे, नितीन लोखंडे, महेश भारंबे, नितीन इंगळे, अशोक पाचपांडे, प्रदीप भंगाळे, संतोष लोखंडे, अशोक नेहेते, आनंदा पाटील, योगेश झांबरे, समाधान कुरकुरे, किशोर पाटील, दिलीप महाजन, गणेश किनगे व बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !