ज्योत्स्ना केदारे विरांगना सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानीत
मनवेल : बामणोद येथील रहिवाशी असलेल्या व यावल जि.प.शाळेतील शिक्षिका ज्योत्स्ना संदीप केदारे यांना नुकताच दिल्ली येथे विरांगना सावित्रीबाई फुले पुरस्कार 2019 ने सन्मानीत करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय दलित साहित्य अॅकेडमी समितीमार्फत तालुक्यातील मनवेल जि.प.शाळेतील मुख्याध्यापक ज्योती चौधरी, यावल येथील ज्योत्स्ना केदारे, चिंचोली येथील शबाना तडवी यांना विरांगना सावित्रीबाई फुले पुरस्कार, परसाडे अजित तडवी व रावेर तालुक्यातील निंबोल येथील विपीन पाटील व उमेश दांडगे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर फेलोशीप पुरस्काराने दिल्ली येथे मानव संसाधन मंत्रालयाचे चेअरमन व खासदार सत्यनारायण जाटीया यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी माजी मंत्री संघप्रीय गौतम, भारतीय दलित साहित्य अॅकेडमीचे अध्यक्ष डॅ.एस.पी.सुमनाक्षर आदी उपस्थित होते.


