पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला : जळगाव जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर !
Panchayat Samiti Elections Bugle Sounded: Reservation of Panchayat Samiti in Jalgaon District Announced ! जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पंचायत समित्यांची पुढील काही महिन्यांमध्ये निवडणूक होत असून त्या अनुषंगाने आज पं.स. सभापतीपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
असे आहे तालुकानिहाय आरक्षण
पारोळा : अनुसुचित जाती महिला,
भुसावळ आणि बोदवड : अनुसुचित जमाती
चोपडा : अनुसुचित जमाती महिला
जळगाव आणि एरंडोल : नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
धरणगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग
रावेर, भडगाव, मुक्ताईनगर आणि चाळीसगाव : सर्वसाधारण महिला
अमळनेर, जामनेर, पाचोरा आणि यावल : सर्वसाधारण प्रवर्ग


अनुसूचित जाती महिला- १; अनुसुचीत जमाती-२ व अनुसुचीत जमाती महिला – १; नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग ( विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसह)-१; नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग महिला ( विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसह) -२ अशा प्रकारे सात पंचायत समिती सभापतीपदे राखीव आहेत. उर्वरित पदांपैकी सर्वसाधारण प्रवर्ग-४ आणि सर्वसाधारण प्रवर्ग महिला – ४ असे आरक्षण निघाले आहे.