अट्रावलच्या तरुणीस पळवले : तरुणाविरुद्ध गुन्हा
यावल : तालुक्यातील अट्रावल येथील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीस पळवून नेल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 14 डिसेंबर रोजी घडली. अट्रावल ता. यावल येथील अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 14 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांची मुलगी, पत्नी व ते असे घरी झोपले असताना रात्री साडेअकरा वाजता त्यांना जाग आली तेव्हा त्यांची 16 वर्षीय मुलगी ही घरातून बेपत्ता होती. रात्रीच त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. सतत सर्व नातेवाईकांकडे शोध घेवुन ती मिळाली नाही तर गावातीलच अजय विलास कोळी हा तरुणदेखील त्याच दिवशी बेपत्ता झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले व त्याच्या घरी जाऊन त्याची तपासणी केली असता तो देखील बेपत्ता असल्याचे त्यांना निदर्शनास आले. तेव्हा त्यानेच आपल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची त्यांना खात्री झाल्याने मंगळवारी यावल पोलिसात त्यांनी संबंधित तरुणाविरुद्ध फूस लावून अल्पवयीनला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रवीकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


