कोरपावलीच्या प्रौढाचा अपघाती मृत्यू : चारचाकी चालकाविरोधात गुन्हा


Accidental death of Korpavali adult: Crime against four-wheeler driver यावल : यावल तालुक्यातील कोरपावली-विरावली दरम्यान पादचारी कोरपावलीच्या प्रौढाला चारचाकी चालकाने उडवल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार चारचाकी चालकाविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातग्रस्त वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.

भरधाव वाहनाने उडवल्याने मृत्यू
२८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कोरपावली येथील राहणारे फिरोज लतीफ तडवी (४२) यांना कोरपावली-विरावली रस्त्यावरील महेलखेडी येथील शेतकरी मधुकर रायभान पाटील यांच्या शेताजवळ रस्त्याने जात असतांना यावलकडून कोरपावलीकडे जाणार्‍या चारचाकी (क्रमांक एम.एच.१९ डी.व्ही.७२२९) या वाहनावरील अज्ञात चालकाने रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करीत फिरोज तडवी यांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू ओढवला होता. या प्रकरणी मयताचे भाऊ रशीद लतीफ तडवी (४५) यांनी यावल पोलिसात फिर्याद दिल्यावरून वरील वाहनाच्या अज्ञात वाहनचालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय देवरे हे तपास करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !