अल्पवयीन लैगिंक अत्याचार पीडीतेतची यावलला व्ही.सी.द्वारे साक्ष
Testimony by Yawal V.C. of a minor victim of sexual abuse यावल : यावल तालुक्यातील एका गावातीलल १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जानेवारी २०२२ मध्ये शेतात सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी जळगाव विशेष बाल न्यायालयात सुनावणी सुरू असून शुक्रवारी या घटनेतील पीडीताची साक्ष विशेष दक्षता घेत यावल न्यायालयाव्दारे व्ही.सी.च्या माध्यमातून जिल्हा न्यायाधीशांनी नोंदवली
तीन संशयीतांनी केला अत्याचार
यावल तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २६ जानेवारी २०२२ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गावालगत रोडवर एकटी पाहुन तीन संशयीतांनी अल्पवयीन शेजारच्या शेतात ओढून नेत सामूहिकरीत्या अत्याचार केला होता. प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. अल्पवयीन मुलगी घराकडे निघाल्यानंतर तिला चालता येत नसल्याने काकांना संशय आल्यानंतर त्यांनी विश्वासात घेत विचारणा केल्यानंतर प्रकार समोर आला होता. अल्पवयीन मुलीसह नातेवाईकांनी यावल पोलिसात तीन संशयीतांविरूध्द गुन्हा दाखल केला होता. तपासात या गुन्ह्यातील दोन संशयीत हे अल्पवयीन होते तर सतीष प्रभाकर धनगर (सांगवी खुर्द) यांच्या मदतीने हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, या खटल्याची जळगाव जिल्हा न्यायालयात विशेष बाल न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पीडीतेची शुक्रवारी साक्ष होती मात्र यावल न्यायालयात विशेष कक्षात तिची व्हीडीओ कॉन्फरेन्स व्दारे विशेष बाल न्यायालयाचे न्यायाधीशांनी साक्ष नोंदवली.


व्हीसीद्वारे साक्षीचा प्रथमच प्रयोग
पीडीतेचे मनोधैर्य खचु नये, तिची ओळख होवू नये व तिला साक्ष नोंदवण्याकरीता जिल्ह्यावर न्यायालयात येण्यास त्रास होवू नये म्हणुन विशेष बाल न्यायालयाकडून यावल न्यायालयात विशेष कक्षात व्हीडीओ कॉन्फ्ररन्सद्वारे व्यवस्था करून तिची साक्ष घेण्यात आली. या कक्षात पीडीतेसोबत रक्तातील नातेवाईकांना उपस्थितीची परवानगी असते व व्हसी समोर केवळ पीडीत आणी विशेष न्यायाधीश यांचा संवाद असतो.
