फारकत न दिल्याने भुसावळातील विवाहितेला मारहाण : ठाण्यातील पतीसह चौघांविरोधात गुन्हा


Beating up a married woman in Bhusawal for not paying: Crime against four people including husband in Thane भुसावळ : फारकत न दिल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेला मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिवे ठार मारण्याची दिली धमकी
तक्रारदार आसमा जावेद शेख (40, बिस्मील्ला अपार्टमेंट, पहिला मजला, ठाणे) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी तथा पती जावेद हमीद शेख याने फारकत मागितली असता ती देण्यास नकार दिल्याने पतीसह सासरच्या मंडळींनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. ही घटना 15 डिसेंबर 2022 रोजी घडली. या प्रकरणी आसमा शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नौशाद हमीद शेख, कामील हमीद शेख, कौसर हमीद शेख, जावेद हमीद शेख (सर्व रा.अयान कॉलनी, भुसावळ) यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक तुषार पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !