पाळधीतील इन्स्ट्राग्राम चालकाविरोधात धार्मिक भावना भडकावल्याने गुन्हा


धरणगाव : इन्स्टाग्रामवरून धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी पाळधीतील इन्स्टाग्राम युजरवरविरुद्ध धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

धरणगाव पोलिसात गुन्हा
रविवार, 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या पूर्वी गौरव बळीराम लोहार (19, रा.पाळधी) याने एका धर्माच्या भावना दुखावणारी क्लिप काढून ती इंस्टाग्राम स्टेटसवर ठेवली. या इंस्टाग्राम स्टेटसमुळे दोन धर्मात वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण केली म्हणून गौरवविरुद्ध हाफिज दादामिया देशपांडे (65) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार गजानन अर्जुन महाजन करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !