मोहाडीतील बेपत्ता तरुणीचा अखेर विहिरीत आढळला मृतदेह


जळगाव : तालुक्यातील मोहाडी गावातील बेपत्ता तरुणीचा विहिरीत मृतदेह आढळला आहे. पूजा भीमराव पवार (16, रा. मोहाडी) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

हरवल्याची दाखल होती तक्रार
जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे पुजा भीमराव पवार ही तरुणी कुटुंबियांसह वास्तव्याला होती. शनिवार, 17 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरात सर्व जण झोपलेले असतांना तरुणी घरातून निघून गेली. दुर्र्‍या दिवशी सकाळच्या सुमारास तरुणीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. अखेर तिच्या कुटुंबियांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गावातील ग्रामपंचायतजवळील विहिरीत तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !