कुर्हेपानाचेत दोन गट भिडले : सात जखमी ; परस्परविरोधात गुन्हे दाखल
हाणामारीत दोन्ही गटातील सात जण जखमी : तालुका पोलिसांची घटनास्थळी धाव
Two groups clashed in Kurhepanache : Seven injured ; Cases Filed Against Each Other भुसावळ : तालुक्यातील कुर्हेपानाचे गावात क्रिकेट बॉल लागल्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटातील सात संशयीत जखमी झाले. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चेंडू लागल्यावरून हाणामारी : एका गटाचे चौघे जखमी
पहिल्या गटातर्फे सविता संतोष पारधी (25, कुर्हेपानाचे) यांनी फिर्याद दिल्यानुसार संशयीत आरोपी श्वेता हर्षल दोडके, हर्षल प्रकाश दोडके (दोन्ही रा.कुर्हेपानाचे), हर्षल संतोष पाटील, ऋषीकेश संतोष पाटील (दोन्ही रा.निंभोल, ता.बर्हाणपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार यांचा मुलगा क्रिकेट खेळत असताना चेंडू श्वेता यांना लागल्याने संशयीतांनी वाद वाढवत तक्रारदारासह त्यांची बहिण रेखाबाई ज्ञानेश्वर पारधी, मेहुणे ज्ञानेश्वर सीताराम पारधी, भाऊ मंगल नथ्थू पारधी (कुर्हापानाचे, ता.भुसावळ) यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करीत शिविगाळ केली.


दुसर्या गटाचीही तक्रार : चौघांविरोधात गुन्हा
दुसर्या गटातर्फे हर्षल प्रकाश दोडके (33, इंदिरा नगर, भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगल नथ्थू पारधी, सविता संतोष पारधी, ज्ञानेश्वर सीताराम पारधी, रेखाबाई ज्ञानेश्वर पारधी (सर्व रा.कुर्हेपानाचे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चेंडू लागल्याच्या मागील कारणावरून संशयीतांनी फिर्यादीसह त्यांची पत्नीला शिविगाळ केली व सासूच्या डोक्यावर काठी मारून दुखापत केली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक दीपक जाधव करीत आहेत.