पहिला पती असताना दुसर्‍याशी थाटला विवाह : पळण्याच्या प्रयत्नात नवविवाहितेसह भुसावळातील महिलेसह तिघांना अटक


Feigned marriage with second husband while first husband: Three arrested along with newlywed woman from Bhusawal for trying to run away भुसावळ : शहापूर येथील युवकाकडून एक लाख रूपये घेत त्याच्याशी विवाह लावून दिला मात्र विवाहाच्या दुसर्‍याच दिवशी शौचास जाते असे सांगून विवाहीता घराच्या बाहेर पडत असतांना शौचालय तर घरातच आहे, बाहेर जाण्याची गरज नाही, असे सांगताच विवाहीता तिच्या भावासोबत घरातून बाहेर पळू लागली, पतीने व घरातील सदस्यांनी पाठलाग करून दोन्ही जणांना पकडले असता, त्यांनी आम्ही दोन्ही पती-पत्नी आहोत, माझा विवाह झाला आहे. असे सांगितल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शहापूर येथून दोन्ही जणांना शहर पोलिस ठाण्यात आणून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर जवळील शहापूर येथील रहिवासी योगेश संतोष महाजन हे अविवाहीत असून रावेर येथील त्यांचे परिचीत अतुल गुर्जर यांच्याशी त्यांचा परीचय होता त्यामुळे त्यांना मुलगी पाहण्यास सांगितले होते. त्यामुळे 15 डिसेंबर 2022 या दिवशी रसलपूरला गेलो असता, अतुल याने सांगितले की तुझ्या लग्नासाठी मुलगी पाहिली आहे, ती मुलगी कंडारी येथे आहे, आपणास तेथे जायचे आहे, असे सांगून कंडारी येथे नेले, कंडारी येथे आशाबाई नावाच्या महिलेशी परीचय करून दिला,यावेळी त्या महिलेकडे एक मुलगी जया सुधाकर पाटील (रा. सुभाष रोड, नाशिक) व तिचा मावस भाऊ सुनील यांच्याशी परीचय करून देण्यात आला असता जयाने विवाहाबाबत होकार दिला मात्र आशाबाई हीने मुलीसोबत विवाह करायचा असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील नाही तर जयाचा विवाह दुसर्‍याशी होईल त्यामुळे एक लाख रुपये देण्यात आले.

न्यायालयात तत्काळ विवाह
जया सोबत विवाह करण्यासाठी योगेश त्याचे वडील संतोष महाजन, त्याचा मित्र अण्णा हे सर्व भुसावळ न्यायालयात शुक्रवार, 16 डिसेंबर रोजी आले. तेथे आशाबाई व सुनील जया पाटील व एक अनोळखी महिलाही आली. आशाबाईच्या परीचीत एक वकीलाकडून नोटरी करून घेत दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास न्यायालयात लग्न लावण्यात आले. साक्षीदार म्हणून आशा भगवान ठाकरे यांनी सही केली. ठरल्याप्रमाणे आशाबाईला सोबत आणलेले एक लाख रुपये देण्यात आले व विवाह झाल्यावर जया शहापूरला जाण्यास निघली असता, सोबत मावस भाऊ सुनील याला सोबत घेण्याचे सांगितले. उद्या याच्यासोबत माहेरी येईल, असे ठरले.



शौचालयाच्या बहाण्याने पळाली नवरी पळाली
विवाहाच्या दुसर्‍या दिवशी शनिवार, 17 रोजी रात्री घरात सर्वच जण असतांना जयाचा भाऊ सुनील हा बाहेर जाण्यासाठी घरातून बाहेर निघाला. त्या पाठोपाठ जयाही निघाली, जयाला कुठे जात आहे, अशी चौकशी केली असता, शौचाला जात असल्याचे तिने सांगितले. मात्र शौचालय घरातच आहे, असे सांगितल्यावर सुध्दा ती पळाल्याने तिला घरातील सदस्यांनी पकडले.

आधारकार्डवरून बनाव आला समोर
यावेळी जया हिच्या आधारकार्ड जवळच्या सेंटरवर जाऊन तपासले असता तिचे खरे नाव निकीता सुधाकर सोळंके (रा.कानोली, ता. दर्यापूर, जि.अमरावती) तर तिच्या सोबत असलेल्या नाव विठ्ठल शामराव काकडे (रा. पळशी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) असे समोर आले. जया व सुनील अर्थात निकीता व विठ्ठल हे दोन्ही पती-पत्नी असल्याचे त्यांनी सांगितले. शहापूर पोलिस ठाण्यात दोन्ही जणांना नेल्यावर त्यांना भुसावळ येथे पाठविण्यात आले.

भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल
भुसावळ शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला. यात प्रकरणी निकीता व विठ्ठल यांना अटक करण्यात आली असून सोमवारी रात्री कंडारी येथील आशाबाई या महिलेस पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अतुल गुर्जरचा शोध पोलिस घेत आहे. पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहे.

फसवणूक झाली असल्यास समोर यावे
शहरात अजून अशी याच लोकांकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी, जेणे करून फसवणूक झालेल्यांची माहिती समोर येऊन दोषींवर कारवाई होऊ शकणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !