हिरापूरच्या महिलेला मुलाच्या लग्न आमिषाने दिड लाखांचा गंडा : पाच संशयीतांविरोधात गुन्हा


A woman of Hirapur was cheated of 1.5 lakhs by luring her son into marriage: a case against five suspects पारोळा : मुलाचे लग्न लावून देतो सांगत हिरापूरच्या महिलेची दीड लाखांत फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पारोळा पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पाच संशयीतांविरोधात गुन्हा
मालूबाई सुभाष पाटील (55, रा.हिरापूर, ता.पारोळा) यांना तुमच्या मुलाचे लग्न करून देतो, असे खोटे आश्वासन देत अनिल संजय पाटील (रा. चोपडा), जितेंद्र अशोक पाटील, नाना पांडुरंग पाटील (दोन्ही रा.सबगव्हाण), राहुल गोवर्धन बोदरे आणि एका महिलेने त्यांची फसवणूक केली. तसेच लग्न लावण्याच्या नावाखाली 30 हजार रुपये तसेच एक लाख 21 हजारात गंडवले. लग्नाची तारखी निघून गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मालूबाई यांनी पारोळ पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विनोद साळी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !