जळगावातील महिला कर्मचार्‍याला अश्लील मेसेज पाठवलेः डेपो कर्मचार्‍याविरोधात गुन्हा


जळगाव : एका महिला कर्मचार्‍याच्या फेसबुकवर अश्लिल मॅसेज पाठवल्याप्रकरणी जळगाव डेपोतील सहाय्यक यांत्रिक कर्मचारीविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

कर्मचार्‍याविरोधात गुन्हा
पीडीत महिला कर्मचार्‍यास सोमवार, 19 डिसेंबर रोजी 10 ते 10.43 वाजेच्या दरम्यान, जळगाव डेपो आगारातील सहाय्यक यांत्रिक विजय पी. पाटील (रा.खोटे नगर, जळगाव) याने फेसबुकवर अश्लिल मॅसेज पाठवून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. यानंतर पीडीतेने पोलिस स्थानक गाठत तक्रार दिल्याने विजय पाटील यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक राजेश पदमर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !