नावरेत सर्पदंशाने 40 वर्षीय इसमाचा मृत्यू


40-year-old Isma died of snakebite in Navarre यावल : तालुक्यातील नावरे येथे एका 40 वर्षीय इसमाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनील भीमसिंग पाटील (40) असे मयताचे नाव आहे.

शेताच्या बांधावर आढळला मृतदेह
सुनील पाटील हे बुधवारी सायंकाळी गुरा-ढोरांना चारा घेण्यासाठी शेत शिवारात गेला असता रात्री घरी परतला नाही. सकाळी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो नावरे फाट्याजवळील पन्नालाल चंपालाल जैन यांच्या शेत बांधावर मयत आढळला. तिथून त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले शिवाय डाव्या हाताला दोन ठिकाणी सर्पदंश झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात हिंमत बाबूराव पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत सुनील पाटील यांच्या पश्चात पत्नी मुलगा, विधवा विवाहित बहिण असा परीवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !