भरधाव दुचाकी धडकल्या ; दोघे ठार


जामनेर : दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील दोन जण ठार झाले. याप्रकरणी गुरुवार २२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पहूर पोलीस ठाण्यात दुचाकीधारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर तालुक्यातील पिंप्री ते पिंपळगाव दरम्यान महामार्गावर हा अपघात घडला.

जागीच दोघे ठार
पहूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सांडू हुसेन शेख (५५, रा. सावळतबारा, ता. ₹सोयगाव जि.औरंगाबाद) हे त्यांचा मुलगा मोसिन शेख याच्यासोबत गुरूवार , २२ डिसेंबर रेाजी सकाळी ११ वाजता दुचाकी (एम.एच.२० एफ.डी.२८३०) ने फत्तेपूरकडून सोयगावकडे जात असताना पिंप्री ते पिंपळगाव महामार्गावरील निवांत ढाब्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी (एम.एच १९ सी.एल.६१६०) याने जोरदार समोरासमोर जोरदार धडक दिली. या धडकेत सांडू हुसेन शेख (५५, रा. सावळतबारा ता.सोयगाव, जि.औरंगाबाद) आणि समोरील दुचाकीस्वार मनोहर पांडुरंग दांडगे (रा. दाभा, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद) या दोघांचा मृत्यू झाला.



पहूर पोलिसात गुन्हा दाखल
यासंदर्भात पहूर पोलीस ठाण्यात शेख वसीम शेख गयास (रा. सुभाष पुरा, फत्तेपूर , ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीधारक मनोहर पांडुरंग दांडगे यांच्या विरोधात दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !