गुन्हेगारांचे त्रिकूट ; जलगाव जिल्ह्यातून चले जाव
जळगाव : जळगाव जिल्ह्यातून तीन अट्टल गुन्हेगारांना एक वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी काढल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली.
अट्टल गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून हद्दपार
जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई गेल्या दोन आठवड्यापासून सुरू आहे. गुरूवार, २२ डिसेंबर रोजी सात गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले तर शुक्रवार, २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गुन्हेगार सागरसिंग जीवनसिंग जुन्नी (२८), रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी (२५) आणि शक्तीसिंग उर्फ हग्गू जीवनसिंग जुन्नी (२८, तिघे रा.राजीव गांधी नगर, जळगाव) या तीन गुन्हेगारांना एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहे. दरम्यान या तिघांवर चोरीचे, हाणामारीचे आणि धारदार शस्त्र वापरून वापरून दमदाटी केल्याचे एकुण ७ गुन्हे दाखल आहेत. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी हद्दपारचे कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिली.

