रोटवद गावाजवळ 31 लाखांचा गुटखा पकडला
धरणगाव : धरणगाव-चोपडा रस्त्यावर रोटवद गावाजवळ अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनातून सुमारे 31 लाख 54 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि गुटखा जप्त केला. या कारवाईत एकाला धरणगाव पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
गोपनिय माहितीवरून कारवाई
सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांना गोपनीय माहिती मिळाली की, चोपडा रोडवरील रोडवद गावाजवळून बेकायदेशीररीत्या गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. धरणगाव पोलिसांनी गुरुवार, 22 डिसेंबर रोजी तातडीने कारवाई करत 407 ट्रक जमा करून एकूण तीस लाख 54 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल यामध्ये गुटखा व वाहन (एम एच 19 सीजी ५८) जप्त केले आहे या कारवाईत वाहन चालक राधेश्याम संजय सूर्यवंशी (रा. पिंपरकोठा, ता.एरंडोल) याला अटक केली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

