जळगावात भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले : अजिंठा चौफुलीवर अपघात
Bike rider Crushed by speeding truck in Jalgaon : Accident on Ajantha Chauphuli जळगाव : भरधाव ट्रकने दुचाकीस्वारला चिरडल्याची संतापजनक घटना शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शहरातील अजिंठा चौफुलीवर घडली. अपघात झाल्यानंतर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. नगीन सकरू राठोड (३८, जळगाव) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू
जळगाव एमआयडीसी भागात राहणारे नगीन सकरू राठोड (३८) आणि उदय गजाजन राठोड (४०) हे दोघे सुनसगाव येथे कामानिमित्त गेले असता शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ते दुचाकीने अजिंठा चौफुलीवर थांबले. यानंतर आकाश वाणीकडून भुसावळकडे जाणारा ट्रक (क्र.एम.एच.४० बी.जी.८९१५) ने त्यांना जोरदार धडक दिल्याने नगीन ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे जागीच ठार झाला तर उदय गंभीर जखमी झाला. दोघे जण बांधकाम आणि भंगार व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे.वाहतूक कोंडी झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

