चुंचाळेतील 35 वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू
A 35-year-old man from Chunchale died after drowning in a well यावल : तालुक्यातील चुंचाळे येथील एका 35 वर्षीय इसमाचा गाव विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. हा प्रकार निदर्शनास येतात त्यांचा मृतदेह यावल रुग्णालयात आणण्यात आला. येथे डॉक्टरांनी शवविच्छेदन करीत मृतदेह कुटुंबीयांना सोपवला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अशोक मधुकर धनगर (35) असे मयताचे नाव आहे.
पाय घसरून पडल्याने मृत्यू
अशोक हा तरुण सायंकाळी गाव विहिरीजवळून जात असतानाच पाय घसरून विहिरीत पडला व पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार निदर्शनास येताच नागरीकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह नातेवाईकांना सोपवला. याप्रकरणी यावल पोलिसात रमेश पितांबर धनगर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.

