श्री साईबाबांची पदयात्रेव्दारे पालखी ; ३१ डिसेंबरला पोहोचणार शिर्डीत
यावल : शहरातील श्री साई भक्तांकडून शुक्रवारी यावल ते शिर्डी पायी पालखी मोठ्या उत्साहात रवाना झाली. तत्पूर्वी शहरातील श्री साईबाबा मंदिरात मान्यवरांच्या हस्ते आरती केल्यानंतर शहरातून शोभायात्रा काढण्यात आली व पायी पालखी घेवुन १०० पदयात्रेकरी शिर्डीकडे रवाना झाली. रस्त्यात आठ दिवस मुक्काम केल्यावर ३१ डिसेंबर रोजी पालखी शिर्डीत दाखल होईल.
पदयात्रेत शंभर यात्रेकरूंचा सहभाग
यावल शहरातील मेन रोडावर असलेल्या श्री साईबाबा मंदिरातून दरवर्षी यावल ते शिर्डी पायी पालखी काढण्यात येते. यंदादेखील १०० पदयात्रेकरूंच्या सहभागाने यावल शहरातून शुक्रवारी पायी पालखी रवाना झाली आहे. तत्पूर्वी श्री साईबाबा मंदिरात डॉ.कुंदन फेगडे, डॉ.जागृती फेगडे तसेच कृष्णा पाटील व पाटील या दोन दाम्पत्यांच्या हस्ते श्रींची आरती, पालखी पूजनासह सर्व धार्मिक विधी पार पाडला. या प्रसंगी दिलीप वाणी, अतुल भालेराव, भुषण फेगडे, पालखी उत्सव समितीचे अध्यक्ष संजय गोविंद पाठक, पालखी अध्यक्ष हिरालाल रघुनाथ सोनार, ज्ञानेश्वर बडगुजर, हर्षल मोरे, गणेश सुरडकर, महेश महाजन, अनिल कोळी, राहुल कोळी, बाळा कोळी, लक्ष्मण सपकाळे, बाळा कोलते, सागर महाजन, संतोष खर्चे,दिपक वाघ सह मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या सहभागाने शहरातून मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली व दुपारनंतर पायी पालखी शिर्डी कडे मार्गस्त झाली.


असा आहे पालखी मार्ग
शुक्रवारी रात्री पालखी धानोरा, ता.चोपडा येथे मुक्काम तसेच चोपडा वेले, अमळनेर, फागणे, झोडगे, चौंडी जळगाव, सावरगाव, कोपरगाव असे मुक्काम करीत ३१ डिसेंबर रोजी श्री साईबाबा मंदिरात शिर्डीत पालखी दाखल होईल.
३ जानेवारीला महाप्रसाद
शहरातील श्री साईबाबा मंदिरात ३ जानेवारी २०१८ रोजी पालखी शांतीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे व त्याच दिवशी सायंकाळी सात वाजेपासून महाप्रसाद वाटप कार्यक्रम घेण्यात येणार आहे.