धक्कादायक ! : पोलिस कर्मचार्‍याने लाच घेतली तीदेखील फोन पे द्वारे : एसीबीने आवळल्या मुसक्या


Shocking! : Policeman takes bribe that too through phone pay : ACB smiles औरंगाबाद : तक्रारदाराविरोधात दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तडजोडीअंती 50 हजारांची लाच मागणी जेवणासाठी फोन पे द्वारे दिड हजारांची लाच घेणार्‍या औरंगाबाद ग्रामीणच्या बिडकीन पोलीस ठाण्यातील नाईक विजय पवार यास अटक करण्यात आली तर या प्रकरणात मध्यस्थी करणारा डोंगरूनाईक तांडा गावाचा पोलिस पाटील गुलाब छगन चव्हाण विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाईने उडाली खळबळ
तक्रारदार यांच्याविरुद्ध बिडकीन पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात फिर्यादी यांना मॅनेज करणे व गुन्ह्यात मदत मिळवून देण्यासाठी पवार याने 80 हजार लाचेची मागणी केली व 50 हजार रुपये तडजोडी अंती पंच साक्षीदार समक्ष लाचेची त्याने मागणी केल्याचं स्पष्ट झाले. त्यानंतर जेवणासाठी देखील आणखी दोन हजार रुपये मागितले असता, फोन पे वरून तडजोडी अंती 1500 ची लाचेची मागणी पंच साक्षीदार समक्ष केल्यानंतर तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली.



पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षिरसागर, अंमलदार राजेंद्र जोशी, भूषण देसाई, दिगंबर पाठक आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !