किन्ही एमआयडीसीत आग : 10 एकरवरील गवतासह झाडे पेटली


Fire in some MIDC : 10 acres of grass and trees burnt भुसावळ : भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसी परीसरात मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास राहुल ग्रॅफाईट या बंद पडलेल्या कंपनीच्या आवारातील झाडे, गवताला आग लागली. हवेच्या वेगामुळे वार्‍यासारखी आग पसरली. रात्री उशिरा अग्निशमन केंद्राच्या बंबांने आगीवर नियंत्रण मिळवले.

रात्री उशिरा आगीवर नियंत्रण
भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसीमध्ये गेल्या काही वर्षापासून बंद पडलेल्या राहुल ग्रॅफाईट या कंपनीच्या परी सरात मोठ्या प्रमाणावर गवत व झाडे उगवलेली आहे. याच परीसरात मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजता गवताने पेट घेतला. या आगीने काही मिनिटात रौद्र रूप धारण केले. यामुळे या परीसरातील कंपनीच्या मालकांनी आणि मजुरांनी आगीकडे धाव घेतली. यावेळी पालिकेच्या अग्निशमन केद्राच्या बंबाने रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम केले. भाजपचे पदाधिकारी सुमित बर्‍हाटे यांनी सुध्दा पालिका व अन्य जणांना माहिती देत आग विझविण्यासाठी मदत केली. एमआयडीसी परीसरातील मोठ्या प्रमाणावर विविध कंपनीच्या मालकांनी गर्दी केली होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !