यावलच्या सूतगिरणीतून एक लाख 35 हजारांचा इलेक्ट्रिकल पंप लांबवला


An electrical pump worth one lakh 35 thousand was extended from the yarn mill of Yawal यावल : शहरातील जे.टी.महाजन जिनिंग सूतगिरणी मधून अज्ञात चोरट्याने एक लाख 35 हजार रुपयांचे इलेक्ट्रिकल मोटरसह साहित्य लांबवले. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

साहित्य चोरीने उडाली खळबळ
जे.टी.महाजन सूतगिरणी ही विक्री झाल्यानंतर खाजगी मालकांच्या ताब्यात असून येथून साहित्य चोरी गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावल शहरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ जे. टी. महाजन जिनिंग सूतगिरणी आहे. सूतगिरणीचा लिलाव झाल्यानंतर ही सूतगिरणी सध्या सोनम शैलेश खाचणे यांच्या मालकीची असून त्यांच्या ताब्यात आहे. या सूतगिरणीमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून जिनिंगच्या शेडमध्ये असलेल्या मशिनरी व इतर साहित्य असा एकूण एक लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे



यावल पोलिसात गुन्हा दाखल
हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलिस ठाण्यात सोनम शैलेश खाचणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पासपोळ करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !