शेताच्या बांधावरून निमच्या शेतकर्याची दुचाकी लांबविली
Nim’s farmer’s bike was extended from the farm embankment अमळनेर : अमळनेर तालुक्यातील निम ते कपिलेश्वर रोड दरम्यानच्या शेतावरील बांधावर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी मंगळवार, 27 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता मारवड पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांचा मोर्चा आता दुचाकीकडे
प्रदीप भगवान धनगर (27, निम, ता.अमळनेर) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. नीम ते कपिलेश्वर रोडवर असलेल्या इंदुबाई पाटील यांच्या शेताच्या बांधावर त्यांची दुचाकी (एम.एच.19 ई.बी.5909) ही दुचाकी सोमवार, 26 डिसेंबर रोजी दुपारी 1 ते 4 वाजेच्या दरम्यान लावली असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. काम आटोपून प्रदीप धनगर हे घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांनी दुचाकी चोरीचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी त्यांनी मारवड पोलिसात तक्रार नोंदवली. तपास पोलिस नाईक सुनील तेली करीत आहे.

