विज्ञानाच्या माध्यमातून मोठी संधी शक्य : सी.डी.साळुंखे

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन : वरणगावसह भुसावळातील विद्यालयाच्या उपकरणांची जिल्हास्तरावर निवड


Great Opportunity Possible Through Science : CD Salunkhe भुसावळ : विज्ञान व गणित हे दोन विषय आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. कळत न कळत दररोज आपण या दोन्ही विषयांचा दैनंदिन व्यवहारांमध्ये उपयोग करत असतो. या विषयांची आपण माहिती जाणून घेतली पाहिजे त्यावर विचार केला पाहिजे, विज्ञान विषय हा अतिशय सोपा व रंजक आहे यामधून नाविण्यपूर्ण समाजोपयोगी साहित्य निर्माण होत असते. विज्ञान विषयाच्या माध्यमातून भविष्यात आपणास विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी आतापासूनच यासाठी तयारी केली पाहिजे. इसरो आईसर होमी भाभा सारख्या वैज्ञानिक संस्थेमध्ये आपल्याला जाण्याची संधी उपलब्ध होऊ शकते विज्ञानाच्या जोरावर आपणाला मोठ्या-मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकत असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता सी.डी.साळुंखे यांनी केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
सुनसगाव येथे 50 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन झाले. दुपारच्या सत्रातील निरोप व बक्षीस समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता सी.डी.साळुंखे होते. यावेळी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता शैलेश पाटील, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी इजाज शेख, प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्ताराधिकारी तुषार प्रधान, माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुहास पाटील, केंद्रप्रमुख कमलाकर चौधरी, गजानन नारखेडे, जितेंद्र झांबरे, कमलाकर चौधरी, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष जे.पी.सपकाळे, नितीन किरंगे, के.डी.तायडे, डॉ.पी.एस.कोळी महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे सहसचिव सुनील वानखेडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.एपीजे अब्दुल कलाम व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर कलाशिक्षक संदीप महाजन व त्यांच्या चमूने स्वागतगीत इशस्तवन सादर केले यानंतर या स्पर्धेतील निवड झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन जयश्री पाटील यांनी व आभार हर्षाली गाढे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले.

जिल्हास्तरासाठी निवड करण्यात आलेले उपकरण असे-
उच्च प्राथमिक गट- प्रथम वेदांत सचिन माळी (महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव, वीट उचलण्याचे यंत्र), द्वितीय- आकांक्षा किशोर नाले (अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ, स्वयंचलित पाण्याचे नळ व ठिबक), तृतीय- मंदार सचिन पाटील (महर्षी व्यास माध्यमिक विद्यालय, वेल्हाळे, होलोग्राम बॉक्स), उत्तेजनार्थ- टीनल युवराज पाटील (दा.दा. पां.पा.माध्यमिक विद्यालय, सुनसगाव)

माध्यमिक व उच्च माध्यमिक गट- प्रथम- गुंजन संजय मावळे (अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ, सैन्य सुरक्षा), द्वितीय- तनिष्क प्रवीण कांबळे (बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ, अ‍ॅक्सीडेंट प्रिव्हेन्शन सेंसर), तृतीय -साक्षांक दिनेश टोके (के.नारखेडे विद्यालय, भुसावळ, डीसी टू एसी कन्वर्टर)

प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य- प्रथम- ज्योती नंदलाल बेलसरे (जि.प.शाळा, टहाकळी, कृतीयुक्त स्तंभालेख), उत्तेजनार्थ- सपना सुभाष राणे (जि.प.शाळा, वांजोळा, स्वयंअध्ययन व खेळ), माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य- प्रथम- मनोज बालकृष्ण झवर (श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालय, भुसावळ, प्रकाशाचे परावर्तन) उत्तेजनार्थ- योगीता दीपक पाटील (अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ, वॉटर सायकल).


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !