सोन्याच्या दागिण्यांसाठी वृद्ध महिलेचा कानच कापला : धरणगाव तालुक्यातील प्रकार
Old woman’s ear cut off for gold ornaments : Type from Dharangaon Taluka सोन्याच्या दागिण्यांसाठी वृद्ध महिलेचा कानच कापला : धरणगाव तालुक्यातील प्रकारधरणगाव : पाचोरा तालुक्यात भर दिवसात वृद्धाला चाकू दाखवून लाखोंचा ऐवज लुटल्याची घटना ताजी असतानाच धरणगाव तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. धरणगाव तालुक्यातील रेल गावातील 70 वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करीत सोन्याच्या दागिण्यांसाठी वृद्धेचा कान कापून कानातील दहा ग्रॅमचे दागिणे व रोकड भामट्याने लांवबली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यरात्री चोरट्याचा प्रताप
गुरुवार, 29 डिसेंबर रोजी रात्री (वेळ निश्चित माहित नाही) विमलबाई श्रीराम पाटील (70, रा.रेल, ता.धरणगाव) या घराच्या वरील पत्री शेडमध्ये एकट्या झोपल्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या कानातील 8 ते 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे किल्लु कान कापून ओरबाडले तसेच डोक्यावर व तोंडावर दुखापत करीत मारहाण केली. सकाळचे 9 वाजूनही विमलबाई खाली न आल्याने शेजारची महिला वर बघायला गेल्या तेव्हा आजी रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आल्या.


पोलिस अधिकार्यांची धाव
घटनेची माहिती मिळताच नातू निलेश मच्छिंद्र पाटील (रा. पिंप्री ता. धरणगाव) घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आजी जवळ साधारण 50 हजाराची रोकड असल्याचेदेखील निलेश पाटील यांनी सांगितले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे. चोपडा विभागीय अधिकारी कृषीकेश रावले, अमळनेर विभागीय अधिकारी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी भेट दिली. पुढील तपास सहा.निरीक्षक गणेश बुवा करीत आहेत.