महालखेड्यातील तरुणाचा इलेक्ट्रीक शॉक लागल्याने मृत्यू
A youth from Mahalkheda died due to electric shock मुक्ताईनगर : तालुक्यातील महालखेडा गावातील तरुणाचा इलेक्ट्रीक शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, 29 रोजी घडली. राहुल गुलाबराव पाटील (20) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक हरीष गवळी करीत आहेत.