रावेरातील दुकान फोडून अडीच हजारांची रोकड लांबवली : आरोपी जाळ्यात


2.500 cash stolen by breaking into a shop in Rawer : Accused In Jail रावेर : शहरातील नागझिरी दर्ग्याजवळील चहाचे दुकान फोडून त्यातील अडीच हजारांची रोकड लांबवण्यात आली. या प्रकरणी एकाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

चोरी करताना आरोपी जाळ्यात
शेख अनिस शेख मौस (55, ईदगाह रोड, रावेर) यांचे नागझिरी दर्ग्याजवळ चहाचे दुकान आहे. संशयीत आरोपी शेख जाहीद शेख दाऊद (नागझिरी मोहल्ला, रावेर) याने 29 रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास दुकानाचे शटर तोडून त्यातील अडीच हजारांची रोकड लांबवली मात्र चोरी करताना आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. तपास उपनिरीक्षक ईस्माईल शेख करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !