तांदलवाडी विकासोतून इन्व्हर्टरची बॅटरी लांबवली
रावेर : तालुक्यातील तांदलवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या तोल काट्यामधून 24 डिसेंबर रोजी दिवसभरात नऊ हजार रुपये किंमतीची इन्व्हर्टरची बॅटरी लांबवली. या प्रकरणी योगेश श्रीराम पाटील यांनी रावेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गणेश सूर्यवंशी करीत आहेत.

