माजी मंत्री खडसेंना पुन्हा धक्का : जिल्हा दुध संघातील नोकरभरती रद्द
Another shock to former minister Khadse: Recruitment in district milk union was cancelled जळगाव : जिल्हा दुध संघात खडसेंच्या झालेल्या पराभवानंतर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंना पुन्हा धक्का दिला आहे. जळगाव जिल्हा दूध संघाची वादग्रस्त ठरलेली नोकर भरती अखेर नवनिर्वाचित संचालक मंडळाने रद्द केली असून त्याबाबतची माहिती भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शनिवारी पत्रपरीषदेत दिली. ते म्हणाले की, आजच्या दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला शिवाय आमदार एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाच्या काळात संघाला तब्बल नऊ कोटी 60 लाखांचा तोटा होता मात्र पदभार घेतल्यानंतर एका महिन्यात 90 लाखांचा नफा मिळविल्याचेही ते म्हणाले.
महिनाभरात 90 लाखांचा नफा
शनिवाी दूध संघाचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक झाली. तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यकाळात गेल्या सहा वर्षांत 9 कोटी 67 लाख रुपयांचा तोटा झाला मात्र ऑगस्ट 2022 या महिन्यात प्रशासकीय मंडळ असल्याने या काळात 20 लाख रूपये नफा झाला, तर आता मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नवीन संचालक मंडळाने पदभार घेतल्यानंतर महिनाभरात 95 लाख रूपयांचा नफा झाल्याची माहिती संचालकांनी प्रसंगी दिली.

खडसेंना धक्का : नोकर भरती अखेर रद्द
जिल्हा दूध संघात 2021 मध्ये 104 कर्मचार्यांची नोकर भरती करण्यात आली मात्र राखीव जागेच्या प्रश्नावरून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने या नोकर भरतीला ‘स्थगिती’ दिली होती. संघाच्या निवडणूक काळात नोकरभरतीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात गाजला होता. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अध्यक्ष असताना या भरतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी गटाने केला होता. पत्रकार परीषदेला दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख उपस्थित होते.