रस्ता ओलांडणार्‍या कठोर्‍यातील पादचार्‍याचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू


Pedestrian dies after being hit by unknown vehicle while crossing the road जळगाव : तालुक्यातील कठोरा येथील प्रौढाला रस्ता ओलांडत असताना दुचाकी वाहनाने उडवल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात 14 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडला. अपघात प्रकरणी रविवार, 22 जानेवारी रोजी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वासुदेव श्रावण सपकाळे (55) असे मयत प्रौढाचे नाव आहे.

रस्ता ओलांडताना दिली धडक
14 जानेवारी रोजी वासुदेव सपकाळे हे गावातील समाधान भागवत शिंदे यांच्यासोबत शौचालयाला जात असताना गावाजवळील जळगाव-भोकर रस्ता पार करत असतांना दुचाकी (एम.एच. 19 डी.जी.9863) या क्रमाकांच्या भरधाव जात असलेल्या दुचाकीस्वाराने वासुदेव सपकाळे व समाधान शिंदे या दोघांना धडक दिली. यात वासुदेव सपकाळे यांचा मृत्यू झाला तर समाधान शिंदे (45) हे गंभीर जखमी झाले. अपघात प्रकरणी रविवार, 22 जानेवारी रोजी मयत वासुदेव सपकाळे यांचा मुलगा पुरूषोत्तम सपकाळे याने तालुका पोलिसात तक्रार दिल्यावरून वरील दुचाकीवरील अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात अनोळखी दुचाकीस्वाराविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर छगन लोखंडे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !