प.क.कोटेचा महाविद्यालयात स्पंदन 2023 चे जल्लोषात उद्घाटन
भुसावळ : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन स्पंदनचे थाटात उद्घाटन झाले. मैदानी स्पर्धांचे उद्घाटन कोषाध्यक्ष राधेश्याम लाहोटी, श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य डॉ.संदीप जैन यांच्याहस्ते झाले. प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा, उपप्राचार्य डॉ.व्ही.एस.पाटील, उपप्राचार्य डॉ.वाय.डी.देसले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक डॉ.सरोज शुक्ला, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.एच.पी.नारखेडे, प्रा.वसंत खरे, स्नेहसंमेलन सचिव प्रणिता भालेराव, श्रावणी चौधरी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
पदम आर्ट गॅलरी व विविध स्पर्धांचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा पदमा मोतीलाल कोटेचा, प्रशांत नाहार, श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य महेंद्र चोरडिया यांच्याहस्ते करण्यात आले. मेहंदी, रांगोळी, कोलाज, फॅशन शो, पोस्टर्स, टाकाऊपासून टिकाऊ, व्यंगचित्र, भावगीत इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.






कलागुणांचे सादरीकरण
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी सामाजिक कार्यकर्त्या माधुरी कोटेच यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून ललिता चोरडिया, वीणा लाहोटी, सदस्य अनिता संघवी उपस्थित होत्या. भाव साक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबद्दलची कृतज्ञता या समाजभाव घडविणार्या विषयावर विद्यार्थिनींनी सुंदर सादरीकरण केले. त्यामध्ये प्रामुख्याने दुहेरी नृत्य, समूह नृत्य, एकांकिका, एकपात्री, मिमिक्री, देशभक्तीपर गीत, वाघ्या मुरळी, सोलो इत्यादी प्रकारचे सादरीकरण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.आर.एच.पाटील तर प्रास्ताविक डॉ.मीना चौधरी तसेच आभार प्रा.नीता चोरडिया यांनी मानले.


