धरणगावातील महावीर कॉटनला मका खरेदीच्या माध्यमातून 30 लाखांचा गंडा : मनमाडमधील दोघांविरोधात गुन्हा
30 lakhs embezzled from Mahaveer Cotton in Dharangaon through the purchase of maize: a case against two in Manmad धरणगाव : मका खरेदीच्या माध्यमातून महावीर कॉटनची 30 लाख 50 हजारात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून मनमाडच्या दोघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अखेर दोघांविरोधात गुन्हा दाखल
संजय समीर ओस्तवाल (48, रा.हावीर कॉटन, धरणगाव) यांच्या मालकीची महावीर कॉटन नावाने नोंदणीकृत भागीदारी संस्था आहे. सन 2020 पासून तर आजपर्यंत दिनेश कांतीलाल लुणावत (शुभम ट्रेडींग, सुभाष रोड, मनमाड ता. नादगाव, जि.नाशिक) ययांनी घेतलेल्या कायदेशीर हमीने शुभम राजेंद्र लुणावत (सुभाष रोड, मनमाड, ता.नांदगाव, जि.नाशिक) यांनी संजय ओस्तवाल यांच्याकडून एकत्रीत 68 लाख 67 हजार 242 रूपये किंमतीचा मका खरेदी केला होता. त्यापैकी केवळ 38 लाख रक्कम ओस्तवाल यांना दिली होती.






रक्कम देण्यास टाळाटाळ
ओस्तवाल यांच्याकडून मका खरेदी करुन त्याबाबतचे संपुर्ण दस्त मे.महावीर कॉटनकडे उपलब्ध असूनही दिनेश लुणावत आणि शुभम लुणावत यांनी 30 लाख 67 हजार 242 एवढी रक्कम देण्यास नकार देवून टाळाटाळ केली. दोघं संशयित आरोपींनी मका खरेदी करते वेळी संगममताने ओस्तवाल यांचा विश्वास संपादन करुन खोटे अश्वासन देत ओस्तवाल यांच्या महावी कॉटन फर्मचे नुकसान व्हावे या उद्देशाने संगणमताने कट कारस्थान रचून फसवणूक केल्याने न्यायालया धाव घेण्यात आली व न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ करीत आहेत.


