भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात नृत्यस्वारांजलीत विद्यार्थांची धमाल


Students dance in Nahata College in Bhusawal भुसावळ : कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात नृत्यस्वरांजली कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कलागुणांची उधळण केली. उद्घाटन बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले. व्यासपीठावर ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, खजिनदार संजयकुमार नाहाटा, प्र.प्राचार्य डॉ.एस.व्ही. पाटील, विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा.ई.जी.नेहते, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, कला मंडळाचे चेअरमन डॉॅ.पी.ए.अहिरे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद
विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले. यात लावणी, सिनेगीत, भावगीत, समूहनृत्य, एकाकी, एकपात्री नाटक, यासह विविध कलाविष्कारांचे सादरीकरण करण्यात आले. यापूर्वी विद्यार्थ्यांनी पारंपरीक वेशभूषा, रांगोळी, चित्रकला, कोलाज, व्यंगचित्र, इन्स्टॉलेशन , क्ले मॉडेल, मेहंदी, स्पॉट स्पेटींग, फोटोग्राफी व पारंपारिक वेशभूषेत सहभाग नोंदविला. परीक्षक डॉ.जे.एफ.पाटील, प्रा.शलाका निकम होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !