औरंगाबाद पोलिसांना वॉण्टेड आरोपींना जळगावातून बेड्या
Aurangabad Police handcuffs wanted accused from Jalgaon जळगाव : औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हा करून दोन महिन्यांपासून महिन्यापासून पसार असलेल्या आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री जळगावच्या प्रजापत नगरात बेड्या ठोकल्या. संशयीतांना औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अजय लिलाधर गोसावी (प्रजापत नगर, जळगाव) व मनोज उर्फ मयूर शालिक चौधरी (तुकारामवाडी, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
दोन महिन्यांपासून आरोपींचा कसून शोध
औरंगाबाद सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 379/2022 प्रमाणे संशयित आरोपी अजय लिलाधर गोसावी व त्याचा साथीदार मनोज उर्फ मयूर शालिक चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून दोघे पसार असल्याने त्यांचा कसून शोध सुरू होता. जळगाव स्थानिक गुन्हेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना संशयतांची माहिती मिळताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले.






यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, महेश महाजन, पोलीस नाईक विजय पाटील, परेश महाजन यांनी कारवाई करत संशयित आरोपी अजय गोसावी व मनोज उर्फ मयूर चौधरी यांना शनिवारी रात्री 9 वाजता प्रजापत नगरातून अटक केली. पुढील कारवाईसाठी त्यांना या औरंगाबाद सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


