बोदवड तालुक्यातील अल्पवयीन तरुणीला पळवले
A minor girl from Bodwad taluka was abducted बोदवड : बोदवड तालुक्यातील सोनोटी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी तरुणाविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध
सोनाटी गावातील अल्पवयीन तरुणीला 27 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास संशयीत विनोद वेडू इंगळे (सोनोटी) याने काहीतरी आमिष दाखवत पळवून नेले. या प्रकरणी तरुणीच्या पित्याने बोदवड पोलिसात तक्रार दिल्यावरून तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सचिन चौधरी करीत आहेत.








