साडेचार लाखांचा ऐवज असलेली पर्स कारमधून भामट्यांनी लांबवली : जळगावातील प्रकार


Purses containing Rs 4.5 Lakhs were stolen from the car by Bhamtas: Jalgaon variant जळगाव : पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी कारमधील साडेचार लाखांचा ऐवज असलेली पर्स लांबवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रविवारी रात्री शनीपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
मनिषा चंद्रशेखर पाटील (42, दत्त मंदीरजवळ, तळेले कॉलनी, जळगाव) या शनिवार, 28 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या घराजवळ असलेल्या कारच्या बोनटजवळ लावली होती मात्र चोरट्यांनी नर चुकवून ही पर्स लांबवली. या पर्समध्ये तीन लाख 87 हजारांची सोन्याचे दागिणे, 40 हजारांची रोकड व दहा हजारांचा मोबाईल असा एकूण चार लाख 37 हजारांचा ऐवज होता. रविवार, 29 जानेवारी रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधा गुन्हा दाखल करण्यात आल. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहे.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !