नायगाव येथील विवाहितेचा विनयभंग
molestation of a married woman in Naigaon यावल : तालुक्यातील नायगाव येथील 50 वर्षीय विवाहितेचा रस्त्यात अडवून विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी एकाविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रविवारी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
रस्ता अडवत केला विनयभंग
50 वर्षीय तक्रारदार महिला या किनगाव येथून नायगाव येथे जात असताना 30 वर्षीय तरुणाने रस्त्यात दुचाकी थांबवून तिच्याशी शारीरीक संबंधाची मागणी केली व तिचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, अशी कृती केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संशयीत जहांगीर बिर्हाम तडवी (30, रा.नायगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहे.








