पोलीस असल्याचे सांगत वृद्धाच्या अंगठ्या लांबवल्या : जळगावातील घटना
An old man’s fingers were extended claiming to be the police : incident in Jalgaon जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) कर्मचारी असल्याचे सांगत दोघत्त चोरट्यांनी सेवानिवृत्त बीडीओ वसंत किसन साळूंखे यांची सोन्याची चेन व अंगठी लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी चार वाजता भर दिवसा आयएमआर महाविद्यालयाजवळ घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रस्ता अडवत केली लूट
साळुंखे हे गणेश कॉलनीमध्ये वास्तव्यास आहेत. दुचाकीची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी सोमवारी दुपारी आयएमआर महाविद्यालयाजवळील बॅटरी रीचार्ज सेंटरवर आले असता पायी परतताना त्यांना एकाने रस्त्यात अडवून मी स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी असून शहरात खुप चोर्या होत असून दागिने सांभाळा असे सांगितले तर त्याचवेळी संशयीताचा साथीदार दुचाकीवरून आला. त्या दोघांनी जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडील दागिने रुमालात ठेवले आणि वसंत साळूंखे यांनाही अंगठी व चेन आमच्याकडे द्या, असे सांगितले. साळूंखे यांनी सुध्दा अंगठी व चेन काढून त्या रूमालामध्ये ठेवली. नंतर त्या दोघांनी रूमाल गुंडाळून साळुंखे यांना देवून तेथून धूम ठोकली. काही मिनिटांनी साळूंखे यांनी रूमाल उघडून पाहिल्यानंतर त्यात दगड मिळून आल्यावर आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आला. सायंकाळी त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.








