मॅटच्या निर्णयाने दिलासा : जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ.विद्या गायकवाड
जळगाव : बदलीनंतर कुठलेही कारण नसताना अवघ्या सहा महिन्यातच जळगावच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची नियमबाह्यपणे बदली करण्यात आली होती मात्र या आदेशाविरोधात मॅटमध्ये धाव घेतल्यानंतर दोन महिन्यांच्या सुनावणीनंतर डॉ.गायकवाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मॅटच्या निर्णयानुसार डॉ.गायकवाड याच जळगावच्या आयुक्त राहणार असून या निर्णयामुळे शिंदे सरकारला मात्र चपराक बसल्याचे बोलले जात आहे.
नियमबाह्यपणे केली होती बदली
जळगाव महापालिक आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची अचानक बदली करून परभणी येथील देवीदास पवार यांची निुयक्तीचे आदेश काढण्यात आले होते. या कालावधीत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड प्रशासकीय प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेल्या होत्या त्यामुळे एकतर्फी पदभार घेतल्याचा त्यांचा दावा केला होता. तर दुसरीकडे देविदास पवार यांनी महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभारदेखील घेतला होता. अवघ्या सात महिन्यात आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्याने डॉ. विद्या गायकवाड यांनी लवाद अर्थात मॅट न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, डॉ. विद्या गायकवाड यांच्या अर्जावर दोन ते तीन वेळा सुनावणी झाली होती. न्यायालयाने त्यांचा निकाल राखून ठेवला होता. त्यानुसार मंगळवार, 31 जानेवारी रोजी मॅटने डॉ. विद्या गायकवाड यांच्या बाजूने निकाल दिला असून सरकारला डॉ.गायकवाड यांची जळगाव महापालिकेत नियुक्तीचे आदेश दिले आहेत.








