दिड लाखांची लाच घेताना कारकून एसीबीच्या जाळ्यात


Clerk in ACB’s net for accepting bribe of Rs सांगली : सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडील कुळवहीवाट शाखेतील अव्वल कारकून अनंता विठ्ठलराव भानुसे (59, रा.क्रांतीनगर, विजयनगर, सांगली) यांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिड लाखांच्या लाच प्रकरणी अटक केली असून रोजगार हमी योजनेत कार्यरत असणार्‍या लिपिक दिलीप निवृत्ती देसाई यांनादेखील लाच देण्यास प्रोत्साहित केल्याने ताब्यात घेतल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली. महार वतन जमिनीची विक्री करण्यासाठी जमीन मालकाला परवानगी देण्यासाठी दीड लाखाची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.

सापळा रचून केली अटक
महार वतनाची जमीन विक्री करण्याची परवानगी मिळण्याकरिता तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेला अर्ज वरिष्ठांना सांगून मंजूर करून देण्यासाठी स्वत:करिता व वरिष्ठांना देण्याकरिता दोन लाखांच्या लाचेची मागणी अनंता भानुसे याने केली होती. त्याबाबत तक्रारदारांनी 19 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपाहारगृहाच्या आवारात दुपारच्या सुमारास भानुसे याला लाच देण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने परिसरात सापळा लावला. तक्रारदारांकडून दीड लाखाची लाच घेताना भानुसे याला रंगेहाथ अटक करण्यात आली.लिपिक दिलीप देसाई यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. हा सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे यांच्या पथकाने केली.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !