दोन मुलांच्या आईनेच केला अल्पवयीन मुलावर अत्याचार : कल्याणमधील धक्कादायक घटना


A mother of two children molested a minor by herself : Shocking incident in Kalyan मुंबई : महिलांसह मुलींवर अत्याचाराच्या बातम्या नेहमीच समोर येतात मात्र मुंबईच्या कल्याणमध्ये दोन मुलांच्या आईनेच परीचीतातील अल्पवयीन मुलाला दारूची सवय लावून त्याच्यावर शारीरीक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोघांच्या संबंधातील सेक्सचे रेकॉर्डींग करण्यात आले व ते मुलाच्या मोबाईलमध्ये आढळले आहे.

अत्याचार करणार्‍या महिलेला अटक
अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाने या महिलेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून ती नाशिकची राहणारी आहे. मुलाच्या आत्यासोबत ती महिला कल्याणला येत असायची. यामुळे त्या मुलाची आणि तिची ओळख होती. मुलगा वयात आला होता, त्याचा फायदा या महिलेने घेतला.







मोबाईल तपासताच बसला धक्का
कल्याण पूर्वमध्ये या मुलाचे घर आहे. त्याची आत्या नाशिकला राहते. तर तिची शेजारीन आरोपी महिला ही दोन मुलांची आई आहे. जेव्हा जेव्हा हा मुलगा नाशिकला आत्याकडे जायचा तेव्हा ती त्याच्याशी बोलायची. याचवेळी त्या महिलेने मुलाला आपल्या जाळ्यात ओढले होते. एके दिवशी त्याला दारु पाजली आणि त्याला अश्लिल व्हिडीओ दाखविले. यानंतर तिने आपला डाव साधायला सुरुवात केली. हा मुलगा तिच्या पाशात पुरता गुंतला होता. घरीही दारु पिऊन येऊ लागला होता. अभ्यासही करत नव्हता. एके दिवशी तो तासंतास मोबाईल बोलत होता, त्याच्या वागण्यामुळे त्रासलेल्या आईने त्याचा मोबाईल चेक केला तेव्हा त्याच्या गॅलरीमध्ये त्याचे आणि त्या महिलेचे अश्लिल व्हिडीओ पाहिले आणि धक्काच बसला. याबाबत विचारताच त्याने सर्व सांगितले. आजतकने याची बातमी दिली आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !