भुसावळात एकाच दिवशी दोन ठिकाणी घरफोड्या

तुकाराम नगरासह विनायक कॉलनीत खळबळ : गस्त ठरतेय नावालाच


Burglary at two places in Bhusawal on the same day भुसावळ : शहरात पोलिसांची गस्त भेदून चोरटे चोर्‍यांसह घरफोडी करीत असल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. जुन्या गुन्ह्यांचा तपास लागत नसताना नवीन होणार्‍या गुन्ह्यांमध्ये यंत्रणेवरही ताण वाढला आहे. शहरातील तुकाराम नगरासह विनायक कॉलनीत चोरट्यांनी पुन्हा घरफोडी करीत एक लाख तीन हजार पाचे रुपयांचा ऐवज लांबवल्याची बाब उघडकीस आली असून या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाचवेळी दोन ठिकाणी घरफोड्या
शहरातील तुकाराम नगरातील एकदंत रेसीडेन्सीत यशोदाबाई पंढरीनाथ कुंभार (66) या वास्तव्यास असून कामानिमित्त त्या 23 ते 30 दरम्यान बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. गेट व घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 25 हजार रुपये किंमतीची रोकड, 30 हजार रुपये किंमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या अंगठ्या व 45 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा गोफ असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज लांबवला. बाहेरगावाहून आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली.







 

दरम्यान तुकाराम नगरापासून काही अंतरावर असलेल्या विनायक कॉलनीतील रहिवासी सुधाकर सावळाराम नाईक यांच्या बंद घरातूनही याच कालावधीत चोरट्यांनी तीन हजार पाचशे रुपये किंमतीचे दोन चांदीचे ग्लास लांबवले. चोरीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तपास हवालदार राजेश शाहू पाटील करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !