साकेगावातील बनावट नोटा प्रकरण : दोघे आरोपी न्यायालयीन कोठडीत
Sakegaon fake note case : Two accused in judicial custody भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे बनावट नोटा आढळल्याप्रकरणी महिलेसह दोघांना अटक करण्यात आली होती. आरोपींना सुरूवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर सोमवारी न्यायालयात हजर केले असता संशयीत आरोपी शहनाज अमीन भोईटे (साकेगाव) व हनीफ अहमद शरीफ देशमुख (नाचणखेडा, ता.जामनेर) यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपींची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली.
आरोपींच्या घरातून बनावट नोटा जप्त
साकेगाव येथे शहनाज नावाच्या महिलेच्या घरातून 21 हजार 700 रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या तर नाचणखेडा येथील हनिफ देशमुख याचे नाव समोर आल्यानंतर त्याच्या घरातूनही 20 हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या शिवाय बनावट नोटांच्या छपाईसाठी वापरलेले प्रिंटर व स्कॅनर नादुरुस्त असल्याने ते जळगावात दुरुस्तीसाठी टाकल्यानंतर तेदेखील जप्त करण्यात आले. तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.








